Karla : एकविरा देवीच्या गडावर घटस्थापना

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामीनी आई एकविरा देवीच्या मंदिरात सकाळी सात वाजता मावळचे तहसीलदार रणजित देसाई यांच्या हस्ते सपत्निक पूजा करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी प्रथमच शासकीय अधिकार्‍यांच्या हस्ते देवीची पूजा व घटस्थापना करण्यात आली.

देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रातील तमाम कोळी, आग्री, सिकेपी अशा विविध समाजाची कार्ला गडावरील एकविरा देवी ही कुलस्वामीनी आहे. कार्ला गडावर पहाटे सहा वाजता देवीचा विधिवत अभिषेक करत तहसीलदार रणजित देसाई यांच्या हस्ते सपत्निक घटस्थापना करून देवीची पहाट आरती करण्यात आली. यावेळी विश्वस्त संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख, विजय देशमुख, वेहेरगावचे सरपंच दत्तात्रय पडवळ, माजी सरपंच गणपत पडवळ, मंडल अधिकारी माणिक साबळे हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.