Kasarwadi : एटीएम ट्रॅन्जॅक्‍शनद्वारे बँकेलाच घातला 90 हजाराचा गंडा

एमपीसी न्यूज – स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या एटीएम मशीनमध्ये ऍक्‍सीस बँकेच्या तीन वेगवेगळया एटीएमद्वारे ट्रॅन्जॅक्‍शन करुन 90 हजार रुपयांना बँकेलाच गंडा घातला आहे. ही घटना कासारवाडी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया कासारवाडी शाखेच्या व्यवस्थापक जयश्री सतीश अय्यर (वय 43, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एटीएम कार्ड धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कासारवाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमध्ये ऍक्‍सीस बँकेच्या तीन वेगवेगळ्या एटीएम कार्डद्वारे ट्रॅन्जॅक्‍शन करत 70 हजार रुपये काढले मात्र अॅक्सिस बँकेकडे पैसे निघाले नसल्याची तक्रार करत कासारवाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून 20 रुपये घेतले. हा गैर व्यवहार 5 ऑक्‍टोबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान घडला आहे. बँकेच्या व्यवहाराचा तपास करत असताना ही बाब निदर्शनास आल्याने अय्यर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झाला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.