BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: महापालिका स्थायी समितीची 93 कोटीच्या विकास कामांना मंजुरी 

295
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 93 कोटी 28 लाख सहा  हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. मनपाच्या स्थापत्य विभागाकडील भोसरी ते वाकड बीआरटीएस रस्त्यावरील विविध सेवावाहिन्या टाकण्यासाठी खोदलेला रस्ता व पदपथ यांचे चर पुर्वरत करण्यासाठीयेणा-या सुमारे दोन कोटी 46 लाख 10 हजार रुपयांच्या खर्चास,  प्रभाग क्र.20 मधील आमंत्रण हॉटेल शेजारील नाला ते कुंदननगर मायानगरी, नाशिक फाटा परिसर व उर्वरीत भागात मुख्य जलनि:सारण नलिका बदलणेकामी येणा-या सुमारे 52 लाख 61  हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.12 मधील तळवडे,रूपीनगर,त्रिवेणीनगर येथे पेव्हींग ब्लॉक बसविणे व दुरूस्ती करणेकामी येणा-या सुमारे 59  लाख 65  हजार रुपयांच्या खर्चास,  महापालिका हद्दीतून वाहणा-या इंद्रायणी नदीपात्रातील हायसिंथ (जलपर्णी)काढून 8 महिने कालावधीत नदीपात्र नियमित स्वच्छ ठेवणे कामीयेणा-या सुमारे 31 लाख 22 हजार रुपयांच्या खर्चास,  उद्यान विभागासाठी कष्टमाईज फॅब्रीकेटेड लोखंडी बेंच आवश्यक साहित्य खरेदीकरणेकामी येणा-या सुमारे 99 लाख 22 हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

राजीव गांधी पुलापासून ते डांगे चौकापर्यंत बीआरटीएस मार्गावरील फुटपाथमध्ये विविध सेवावाहिन्या टाकण्यासाठी खोदलेलेचर बुजविणे व फुटपाथ दुरूस्ती करणेकामीयेणा-या सुमारे 2 कोटी 31 लाख 73 हजार रुपयांच्या खर्चास,  प्रभाग क्र.3 येथील सर्व्हे क्र.519 ते 475 पर्यंतचा 30 मी. डि.पी. रस्ता विकसित करणेकामी येणा-या सुमारे 38 कोटी 24  लाख 70 हजार रुपयांच्या खर्चास, तसेच साईमंदीर, कोतवालवाडी, च-होली गावठाण इ. भागातील रस्ते विकसित करणेकामी येणा-या सुमारे 10 कोटी 77 लाख 82  हजार रुपयांच्या खर्चासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

भोसरी स.नं.1 मधील खेळाचे मैदानासाठी प्रेक्षक गॅलरी उभारणेकामीयेणा-या सुमारे 12 कोटी 32  लाख सहा हजार रुपयांच्या खर्चास,  प्रभाग क्र. 35 येथील स.नं.1 मधील आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उर्वरीत अनुषंगीककामे करणेकामी येणा-या सुमारे 8 कोटी 77  लाख 2 हजार रुपयांच्या अशा 93 कोटी रुपयांच्या विकास कामांना या बैठकीत मान्यता देण्यात आली.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3