Khadakwasla : मित्राला पिस्तूल दाखवणे पडले महागात; पिस्तुलातून चुकून गोळी सुटली अन्…

एमपीसी न्यूज : खडकवासला (Khadakwasla) परिसरात अवैधरित्या खरेदी केलेल्या पिस्तुलातून चुकून गोळी सुटल्याने एक तरुण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. उत्तमनगर पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.

खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरजवळ असलेल्या सांगरुण गावात ही घटना घडली. या अपघातात अभय छगन वायकर (वय 22 वर्ष) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे (वय 19, रा. सांगरुण गावात) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

या घटनेची नोंद पोलिस कॉन्स्टेबल आनंद घोलप यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात दिली. अभय वायकर आणि आविष्कार धनवडे हे मित्र असून दोघेही सांगरूण गावचे रहिवासी आहेत.

Bhosari : इंडियन मेडिकल अससोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखेच्या वतीने ‘आओ गांव चले’ उपक्रम

वायकर याला अवैध देशी बनावटीचे पिस्तूल (Khadakwasla) मिळाले होते, जे तो धनवडे याला दाखवत होता.  त्यावेळी बंदुक हाताळत असताना अनवधानाने धनवडेने ट्रिगर ओढल्याने वायकर यांच्या मानेला गोळी लागली. वायकर यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने एरंडवणे परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.