Khadakwasla : खडकवासला जलाशय रक्षण हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्‍था आणि खडकवासला ग्रामस्‍थ यांचा संयुक्‍त उपक्रम

एमपीसी न्यूज – भारतीय संस्कृतीप्रमाणे आनंदाने (Khadakwasla) सण साजरा करताना सर्वांनी मिळून आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी पुणे येथे गेली 21 वर्षे सातत्याने आणि यशस्वपीपणे चालू असलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ यंदाच्या वर्षीही सर्वांच्या सहभागाने राबवण्यात येणार आहे, अशी माहिती पराग गोखले यांनी दिली.

पराग गोखले पुढे म्हणाले की, खडकवासला जलाशय रक्षण अभियानाचे यंदाचे हे 22 वे वर्ष असून 25 मार्च (धुलीवंदन) आणि 30 मार्च (रंगपंचमी) या दोन्‍ही दिवशी प्रबोधनात्‍मक फलक हातात धरून सकाळी 9 पासून सायंकाळी 7 पर्यंत खडकवासला जलाशयाच्‍या भोवती मानवी साखळी करून जलाशयाचे रक्षण करण्‍याकरीता प्रबोधन करण्यात येणार आहे. हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्‍था, खडकवासला ग्रामस्‍थ, अन्‍य समविचारी संघटना, स्थानिक प्रशासन, पाटबंधारे खाते आणि पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने हा उपक्रम 100 टक्के यशस्वीपणे पार पडत आहे.

Alandi : आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी प्रा . दिनेश गुंड यांची निवड

खरे तर होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हे जीवनातील अमंगल त्यागून जीवनात आनंद अन् उत्साह यांचे रंग भरणारे सण आहेत; मात्र या दिवशी काही जण रासायनिक वा त्वचेला हानिकारक रंग फासणे, रंग खेळून नैसर्गिक जलस्रोतात वा जलाशयात उतरणे, दारू पिऊन गैरवर्तन करणे, महिलावर पाण्याचे फुगे मारणे, महिलांची छेड काढणे, रेव्ह पार्ट्यांचे आयोजन आदी सामाजिक वातावरण बेरंग करणारे प्रकार (Khadakwasla) करतात. यामागे धर्मशिक्षणाचा अभाव हे ही मुख्य कारण आहे. समाजहितासाठी, तसेच सण-उत्‍सव यांमागील मूळ उद्देशच साध्य होण्यासाठी या चुकीच्या गोष्टी थांबणे अत्यंत आवश्यक आहे. यात आता धुलीवंदन आणि रंगपंचमी या दिवशी अंगाला रंग लावून खडकवासला जलाशयात आंघोळीसाठी येणे हा प्रकार पर्यावरणाला हानीकारक आहे. संपूर्ण पुणे शहराला पाणीपुरवठा करणारा जलस्रोत प्रदूषित होत आहेत, याचे भान रंगपंचमी खेळणाऱ्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

खरे तर धर्मशास्त्र हे पर्यावरण पूरक असल्याने होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करतांना सणांचे, तसेच पर्यावरणाचे पावित्र्य राखले जावे, हा संदेशही या अभियानातून देण्यात येणार आहे. यासाठी या अभियानात अधिकाधिक जणांनी सहभागी होण्‍यासाठी 89833 35517 या क्रमांकावर संपर्क साधण्‍याचे आवाहन पराग गोखले यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.