Alandi : आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी प्रा . दिनेश गुंड यांची निवड

एमपीसी न्यूज : इस्टोनिया कुस्ती संघटनेच्या वतीने टेलिन् ( युरोप ) येथे होणाऱ्या (Alandi) आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी प्रा . दिनेश गुंड यांची इस्टोनिया कुस्ती संघटनेच्या समिती कडून निवड करण्यात आली. ही स्पर्धा दि. 23 ते 26 मार्च या कालावधीत टेलिन् ( युरोप )येथे होणार आहे.

Today’s Horoscope 23 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

प्रा. दिनेश गुंड हे जागतिक कुस्ती संघटनेचे प्रथम श्रेणीचे पंच असून ही त्यांची 58वी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक आशियाई, जागतिक, विश्वचषक तसेच ऑलम्पिक पात्रता स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले आहे. 100 हून अधिक राष्ट्रीय स्पर्धा आणि 58 आंतरराष्ट्रीय स्पर्धा अशी कामगिरी करणारे महाराष्ट्रातील ते एकमेव तांत्रिक अधिकारी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.