Khadakwasla : एनडीएने महान योद्ध्यांना जन्म दिला – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

एमपीसी न्यूज : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (30 नोव्हेंबर 2023) खडकवासला (Khadakwasla) येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145 व्या अभ्यासक्रमाच्या पासिंग आऊट परेडचा आढावा घेतला. आगामी 5 व्या बटालियनच्या इमारतीची पायाभरणीही त्यांनी केली.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, एनडीए हा नेतृत्वाचा पाळणा आहे. ज्याने महान योद्ध्यांना जन्म दिला आहे. देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थांमध्ये या अकादमीचे विशेष स्थान आहे आणि सशस्त्र दल आणि देशासाठी एक मजबूत आधारस्तंभ म्हणून ओळखले जाते.

एनडीएकडून मिळालेले प्रशिक्षण आणि जीवनमूल्ये कॅडेट्सना आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतात असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी कॅडेट्सना भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शिकून त्याचा अवलंब करून पुढे जाण्याचा सल्ला दिला. सशस्त्र सेवेतील मूल्ये पुढे नेत प्रत्येक आव्हानाला धैर्याने आणि शौर्याने सामोरे जातील, असा विश्वासही व्यक्त केला.

Maharashtra : अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

राष्‍ट्रपतींना प्रथमच एनडीएच्‍या पासिंग आऊट परेडमध्‍ये मार्चिंग तुकडी म्हणून महिला कॅडेट्सचा सहभाग पाहून आनंद झाला. (Khadakwasla) हा दिवस खर्‍या अर्थाने ऐतिहासिक असल्याचे त्या म्हणाल्या. भविष्यात सर्व महिला कॅडेट्स देश आणि एनडीएला नव्या उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी भारताच्या सीमांचे संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा आवश्यक असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. आम्ही ‘वसुधैव कुटुंबकम’ या परंपरेचे पालन करतो, परंतु, देशाच्या एकता आणि अखंडतेच्या भावनेला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही बाह्य किंवा अंतर्गत परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमचे सैन्य पूर्णपणे सक्षम आणि तयार आहे, असे त्यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.