Rajya Sabha : इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांची राज्यसभेसाठी उमेदवारी, पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली माहिती

एमपीसी न्यूज : जागतिक महिला दिनानिमित्त (Rajya Sabha) महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. इन्फोसिसच्या सहसंस्थापक आणि चेअरमन नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. राज्यसभेसाठी नामांकन मिळाल्यावर सुधा मूर्ती यांनी आनंद व्यक्त केला आणि महिला दिनानिमित्त त्यांच्यासाठी ही मोठी भेट असल्याचे सांगितले.

Alandi : महाशिवरात्री निमित्त श्री सिध्देश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी

पंतप्रधानांनी लिहिले की, मला आनंद होत आहे की सुधा मूर्ती यांना भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी नामांकित केले आहे. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आपल्या ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा आहे, जी आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांची ताकद आणि क्षमता दर्शवते. मी त्यांना यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.

सुधा मूर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा असून त्या सुप्रसिद्ध लेखिका आहेत. त्या महिला आणि मुलांसाठीही काम करत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर अनेक (Rajya Sabha ) प्रेरणादायी पुस्तके लिहिली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.