Alandi : महाशिवरात्री निमित्त श्री सिध्देश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज : दि.8 रोजी आज महाशिवरात्री निमित्त आळंदी (Alandi) येथील श्री सिध्देश्वराच्या मंदिरात सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.यावेळी अनेक भाविकांनी सिद्धेश्वराचा दुग्ध व जलाभिषेक करत बेलपत्र व पुष्प वाहीली.

तसेच यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले.महाशिवरात्री निमित्त मंदिरात शिवभक्तांनी उपवासाच्या पदार्थाचे वाटप केले.
आज संध्याकाळी शिवरात्री निमित्त भैरवनाथ मंदिरात प्रसादाचे(दूध) वाटप होणार आहे.व संध्याकाळी वैतागेश्वर मंदिरात सुद्धा दर वर्षाप्रमाणे (दूध)प्रसादाचे वाटप शिव भक्तांकडून होणार आहे.

वडगांव घेनंद येथील श्री क्षेत्र बेली महादेव मंदिरात सुद्धा महाशिवरात्री निर्मित भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांस यावेळी खिचडी व केळी चे वाटप शिव भक्तांकडून करण्यात येत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.