Vadgaon Maval : राष्ट्रवादी मावळ तालुका सामाजिक न्याय विभाग सेलच्या अध्यक्ष पदी मनीषा रघुवंशी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे ( Vadgaon Maval ) येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित जाती सेलच्या शहराध्यक्षा मनीषा महेश रघुवंशी यांची मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्यकारिणी नियुक्तीपत्र वाटप व संवाद मेळावा गुरुवारी (दि. 7) वडगाव मावळ येथे पार पडला. यावेळी आमदार सुनिल शेळके, सारिका शेळके, महिला तालुका अध्यक्षा दीपाली गराडे, सर्व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

कार्यक्रमात आमदार सुनिल शेळके, सारिका शेळके, महिला तालुका अध्यक्षा दीपाली गराडे यांच्या हस्ते रघुवंशी यांना नियुक्तिपत्र देण्यात (Vadgaon Maval ) आले. समाजातील वंचित घटकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनीषा रघुवंशी यांनी सांगितले.

पक्षाच्या तालुका अध्यक्षा दीपाली गराडे आणि कुलस्वामिनी महिला मंचच्या मुख्यप्रर्वतक सारीका शेळके यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.