Talegaon Dabhade : रोटरी सीटीची रविवारी सायक्लोथॉन

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, (Talegaon Dabhade) तळेगाव दाभाडे नगर परिषद, रोटरॅक्ट क्लब व वास्तू डेव्हलपर्स प्रस्तुत रोटरी सिटी सायक्लोथॉन रविवारी (दि. 10) रोजी आयोजित करण्यात आली आहे. रविवारी सकाळी 7 वाजता मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथून या सायक्लोथॉनला सुरुवात होणार आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन डी पाटील, उपमुख्यअधिकारी ममता राठोड, रोटरीच्या डिस्टिक गव्हर्नर रोटरियन मंजू फडके, उद्योजक निलेश भोसले, रोटरी सिटीचे अध्यक्ष रो सुरेश शेंडे, उपाध्यक्ष रो किरण ओसवाल, सेक्रेटरी भगवान शिंदे, रोटरेक्टचे अध्यक्ष हर्षद झवेरी, सचिव रोशनी ओसवाल आदी उपस्थित राहणार आहे.

Vadgaon Maval : राष्ट्रवादी मावळ तालुका सामाजिक न्याय विभाग सेलच्या अध्यक्ष पदी मनीषा रघुवंशी

आंतर शालेय 17 वर्षाखालील महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये निवड झालेला तळेगाव शहरातील (Talegaon Dabhade) क्रिकेटपटू चैतन्य कोंडभर व नॅशनल गेम्स वुशु चॅम्पियन ऋतुजा सुर्वे यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमात केला जाणार आहे. तसेच सन 1950 पासून इंदोरी ते तळेगाव असा दररोज सायकलने प्रवास करणारे जेष्ठ व्यक्तिमत्व गोविंद तुकाराम उबाळे (वय 90) यांचा देखील विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव, आपलं तळेगाव तसेच माझी वसुंधरा या विषयावर सायकल सजावट स्पर्धा व वेगवेगळे संदेश घेऊन येणाऱ्या सायकल सजावट करून येणाऱ्या मधून तीन विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. यावेळी लकी ड्रॉ काढला जाईल. तळेगाव शहरातील व मावळ पंचक्रोशीतील अंतर शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या सायकली घेऊन जास्तीत जास्त मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख रो संतोष परदेशी व उपप्रकल्प प्रमुख रो रितेश फाकटकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.