Chinchwad : हेच का महिला स्वातंत्र्य? वडिलांच्या संपत्तीतून वाटा माग म्हणत विवाहितेचा छळ, विहाहितेची गळफास घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज – आज जागतिक महिला दिन..महिलांनी(Chinchwad) लढावं आपला हक्क मागावा समानता आणावी यासाठी हा दिन साजरा केला जातो. पण त्याच स्त्रीला आज मितीला हक्काचे नाव पुढे करत जर छळ केला जात असेल तर या महिला दिनाचा काय उपयोग? असाच धक्कादायकप्रकार पिंपरी-चिंचवड येथील वडमुखवाडी येथे घडला आहे.

मुळात मुलगा आणी मुलगी समानता यावी म्हणून न्यायालयाने मुलीला वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळावे असा न्याय दिला. पण या हक्काची सुत्रे अप्रत्यक्षपणे सासरच्या मंडळीनी आपल्या हातात घेतली. त्या संपत्तीत तुझा हिस्सा माग म्हणत विवाहितेचा छळ केला आहे. सासर व माहेर यांच्या मध्ये अडकलेल्या पिडीतेने अखेर गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे. ही घटना बुधवारी (दि.6) वडमुखवाडी येथे घडली आहे.

Talegaon Dabhade : रोटरी सीटीची रविवारी सायक्लोथॉन

याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.7) फिर्याद दिली आहे. त्यावरून पती प्रसाद बाळासाहेब वीर (वय 29 रा.वडमुखवाडी), दोन महिला आरोपी, सासरे बाळासाहेब नानासाहेब वीर ( रा.आष्टी बीड) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा 24 फेब्रुवारी 2022 साली आरोपीशी विवाह झाला. मात्र मागील पाच ते सहा महिन्यांपासून आरोपी हे पिडीतेला तू मुलगी आहेस तुझा वडिलांच्या संपत्तीवर हक्क आहे. तू जमिनीतील वाटा माग म्हणत वेळोवेळी भांडणे केली. त्यानंतर किरकोळ कारणावरून पिडीतेचा शारीरिक व मानसिक छळ केला. यातून पोलिसात तक्रार केली तर धमकी दिली. पती व सासरच्या जाचाला (Chinchwad) कंटाळून पीडितेने अखेर राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

महिलेला जसा वडिलांच्या संपत्तीत वाटा देण्याचा हक्क दिला असला तरी आज ही तिला तिचे निर्णय घेण्याचा अद्याप स्वातंत्र्य आहे का असा सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.