Ravet : इव्हेंटचा बहाणा करून डी.वाय. पाटील महाविद्यालयसह एका खासगी संस्थेची सुमारे 14 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी (Ravet) असल्याचे भासवून, इव्हेंटच्या बहाण्याने आकुर्डी येथील डी.वाय.पाटील इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट व किशोर गौर सिम्प्लिफाई सक्सेस फर्म यांना तब्बल 14 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा सारा प्रकार 19 जुलै 2023 पासून आज अखेरपर्यंत घडला आहे.,

याप्रकरणी डॉ. कुलदिप ओंकारसिंग चरक (वय 62 रा.हडपसर) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून आयरीस ग्लोबल मिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद हेगडे यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आाला आहे.

Chinchwad : हेच का महिला स्वातंत्र्य? वडिलांच्या संपत्तीतून वाटा माग म्हणत विवाहितेचा छळ, विहाहितेची गळफास घेत आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीने फिर्यादी यांना डॉ. डी वाय पाटील इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आकुर्डी येथे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्याचे भासवून त्यांच्याकडून 5 लाख रुपये घेतले. त्यातील 1 लाख 2 हजार रुपये परत करून उर्वरित 3 लाख 98 हजार रुपयांची फसवणूक केली.

तसेच सिम्प्लिफाई सक्सेस फर्मचे सह संस्थापक सिद्धार्थ किशोर गौर यांना देखील आरोपीने डी वाय पाटील युनिव्हर्सिटी येथे टीईडीएक्स इव्हेंट आयोजित करणार असल्याचे भासवून त्यांच्याकडून 10 लाख रुपये घेत इव्हेंट आयोजित (Ravet) न करता त्यांची फसवणूक केली. अशी एकूण 13 लाख 98 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यावरून रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.