Bhosari : निवृत्त  वन अधिकारी विश्वास वाळके यांचे निधन

एमपीसी न्यूज – भोसरी येथील रहिवाशी निवृत्त वन अधिकारी (Bhosari) विश्वास कृष्णाजी वाळके (वय 80) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गुरुवारी सकाळी सात वाजता राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर निवडणूक प्रभारी अशोक वाळके यांचे ते मोठे बंधू होत.  विश्वास वाळके यांनी वनअधिकारी म्हणून नोकरी केली.   देशामध्ये वाघ पाळणारे ते एकमेव वन अधिकारी होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.