Pune : विद्यापीठाकडून सेट परीक्षेची तारीख जाहीर, 7 एप्रिल रोजी होणार परीक्षा

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune ) वतीने राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता (सेट) परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 7 एप्रिल 2024 रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. सेटची ही 39 वी परीक्षा असून पारंपारिक पद्धतीने (ऑफलाईन) होणारी ही शेवटची परिक्षा असणार आहे.

परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख अजून जाहीर करण्यात आली नसून, लवकरच ती जाहीर होईल, अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे आणि सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी दिली आहे.

Khadakwasla : एनडीएने महान योद्ध्यांना जन्म दिला – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

17 शहरांमधील जवळपास 262 परीक्षा केंद्रांवर ही परिक्षा घेण्यात येणार आहे. कोणत्याही विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी (Pune ) परीक्षेत 55 टक्के गुण (राखीव 50 टक्के) मिळवलेला विद्यार्थी किंवा शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थीही या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषेत ही परीक्षा घेतली जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.