Chikhali : चिखलीतील मैदान हॉर्स रायडिंगसाठी दिल्याच्या निषेधार्थ उपोषण

एमपीसी न्यूज – नागरिकांच्या हक्काचे मोशी, चिखली (Chikhali) येथील रिव्हर रेसिडन्सी मैदान हॉर्स रायडिंगसाठी दिल्याचा निषेधार्थ ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपसंघटिका रुपाली आल्हाट या बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. त्यामुळे मैदानाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मोशी-चिखली येथील रिव्हर रेसिडन्सी श्रीराम चौकात उपोषणाला बसल्या आहेत. चिखलीतील 1 हेक्टर जागा महापालिकेने सन 2005 साली खेळाच्या मैदानासाठी आरक्षित केली होती. 15 हजार 600 चौरस मीटर भूखंड सन 2010 मध्ये टीडीआरच्या मोबदल्यात मूळ मालकाकडून महापालिकेच्या ताब्यात आला.

मैदानालगत सीमाभिंत बांधून हे मैदान नागरिकांसाठी खुले करण्यात आले. या परिसरात मोठ-मोठे गृहप्रकल्प उभे राहिले (Chikhali) आहेत. या गृहसंस्थांमधील आबालवृद्ध या मैदानाचा वापर चालणे, धावणे, कवायत करणे, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आदीसांठी करत होते.

Pune : विद्यापीठाकडून सेट परीक्षेची तारीख जाहीर, 7 एप्रिल रोजी होणार परीक्षा

आयुक्तांनी नागरिकांच्या हक्काचे मैदान सर्व विरोध डावलून थेरगाव येथील कृष्णा सामाजिक सेवा प्रतिष्ठान या संस्थेला हॉर्स रायडिंगसाठी करारपद्धतीने ठराव करुन चालविण्यास मोफत दिले. ही संस्था हॉर्स रायडिंगसाठी प्रतिव्यक्ती आठ ते दहा हजार रुपये शुल्क आकारणार असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

हॉर्स रायडिंग आर्थिक खेळ

मोक्याची जागा महापालिकेकडून संस्थेच्या नावाने कमी भावात भाड्याने घ्यायची आणि त्यावर मोठा आर्थिक फायदा करून घेतला जात आहे. या मैदानाच्या बाजूला 4-5 मोठ्या शाळा आहेत. त्यांच्याशी एग्रीमेंट करून हा डूब्लिकेट एशियन सिल्व्हर मेडलिस्ट 15 हजार भाड्यात लाखो रुपये कमावणार आणि आम्ही रहिवासी आपल्याला टॅक्स भरत राहणार, या बदल्यात आम्हाला ना ग्राउंड ना गार्डन ,सुविधा नाही मग पैसे का गोळा करता. आमचे टॅक्स रूपाने पैसे गोळा करता तर आमच्या मागण्या पूर्ण करा, याच्या मागे कोणी तरी मोठी राजकीय व्यक्ती असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.