Bhosari : इंडियन मेडिकल अससोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखेच्या वतीने ‘आओ गांव चले’ उपक्रम

एमपीसी न्यूज : इंडियन मेडिकल अससोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी (Bhosari) शाखेच्या वतीने ‘आओ गांव चले’ उपक्रमाअंतर्गत गोडुंबरे गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सुमारे 75 विध्यार्थ्यानी त्यात सहभाग घेतला व सुंदर गणेश मूर्ती बनवल्या. अध्यक्ष डॉ सुशील मुथियान, सचिव डॉ अनिरुध्द टोणगावकर, खजिनदार डॉ विकास मांडलेचा, डॉ माया भालेराव, डॉ दीपाली टोणगावकर, डॉ सुधीर भालेराव, डॉ सुहास लुंकडं व इतर सदस्य या वेळी उपस्थित होते. त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन शालेय जीवनाची पुनःश्च अनुभूती घेतली.

Maharashtra :‘मी सुपरहिरो भारताचा नागरिक’ या मतदार जागृतीसंबंधी पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते 11 सप्टेंबर रोजी प्रकाशन

डॉ दीपाली टोणगावकर, सौं मीनल टोणगावकर,जिल्हा परिषद शाळेचे मुख्यअध्यापक अल्हाट सर व सिटी प्राईड शाळेच्या शिक्षिका प्रणाली मॅडम, मयुरी मॅडम व भावेश सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.