Khandala : मंकीहिल जवळ दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत

एमपीसी न्यूज- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर मंगळवारी (दि. 25) रात्री साडेदहा वाजता ठाकूरवाडी ते मंकीहिल दरम्यान दरड कोसळली. या घटनेमुळे डाउन लाइन आणि मिडल लाइनवरील वाहतूक ठप्प झाली.

दरड कोसळल्यामुळे मुंबईहून निघालेली चेन्नई एक्सप्रेस ठाकूरवाडी स्टेशनवर थांबवण्यात आली. या घटनेमुळे अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. डाउन आणि मिडल लाइनवरील दरड हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. 13 जूनच्या रात्रीही ठाकूरवाडी ते मंकीहिल दरम्यान दरड कोसळली होती. गेल्या वेळच्या घटनेपासून किमान एक किलोमीटर अगोदर ही दरड कोसळली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.