Landslide in Parshuram Ghat : परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्ग ठप्प

एमपीसी न्यूज – मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी असून चिपळूणजवळच्या परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे येथील वाहतूक अद्यापही बंदच आहे. काल या घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे येथील वाहतूक बंद होती. दुपारी चारनंतरसुध्दा घाटातील (Landslide in Parshuram Ghat) वाहतूक बंद होती. त्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात रांग लागली होती. आज घाटाची पहाणी करुन वाहतुकीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, येत्या 4 – 5 दिवसांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये आरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये रात्रभर जोरदार पाऊस होत आहे.त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे.

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे सोडून 14 आमदारांना निलंबनाची नोटीस

कोकणात मुसळधार पाऊस

दक्षिण कोकण व गोवा भागात सकाळपासून पाऊस आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे 200 मिलीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. रत्नागिरीतील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. कोकणात पुढील काही तासात मध्यम ते तीव्र सरींची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रायगड, (Landslide in Parshuram Ghat) रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अंबा,सावित्री,पाताळगंगा, उल्हास, आणि गाढी नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा थोडी कमी आहे. त्याचप्रमाणे जगबुडी,काजळी नदीच पाणी इशारा पातळीच्या वरुन वाहत आहे. या भागातील नागरिकांना सुरक्षित जागी पोचविण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले

रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. महाड शहरातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दस्तुरी नाका ते रायगड रोड येथे पाणी साचले आहे. पाऊस सुरुच असल्याने पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दिवसभरात येथे 140 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.