Pune Crime News : गुवाहाटीच्या तरुणाला अटक, 21 लाखाचे मेफेड्रॉन जप्त

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या एका कारवाईत गुवाहाटी येथील एका तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून तब्बल 171 ग्राम मेफेड्रॉन जप्त  (Pune Crime News) करण्यात आले. त्याची किंमत तब्बल 21 लाख रुपये इतकी आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील शिवरे नगरमध्ये ही कारवाई करण्यात आली. राहुल हितेश्वर नाथ (वय 24) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे सोडून 14 आमदारांना निलंबनाची नोटीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात अमली पदार्थ विक्रीचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तस्करांकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची  (Pune Crime News) विक्री होत असल्याचं या कारवाईतून पुढे आले आहे.

 

रविवारी कोंढवा परिसरात अशीच एक कारवाई करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथकांने आरोपी तरुण हा मेफेड्रॉन नावाचं अमली पदार्थ विकत असल्याची माहिती मिळाली होती.

 

त्यानुसार पोलिसांनी शिवरेनगर परिसरात सापळा लावून आरोपीला पकडले. त्याच्या ताब्यातून 171 ग्राम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
त्यांनी हे अमली पदार्थ कुठून आणले आणि कोणाला विकले याचा तपास आता गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.

 

Earthquake : अंदमान-निकोबारसह जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंपाचे हादरे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.