Aditya Thackeray : आदित्य ठाकरे सोडून 14 आमदारांना निलंबनाची नोटीस

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या पंधरा दिवसात अनेक व्टिस्ट आणि टर्न बघितले आहेत. राजकारणातील सध्या सुरु असलेले धक्कातंत्र अद्यापही सुरु आहे.सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणीवेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही शिंदे गटाचा व्हिप झुगारला. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मतदान केले. पण त्यांना निलंबनाची नोटीस पाठविण्यात आली नाही.

एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी उध्दव ठाकरे यांच्या समर्थनात असलेल्या 15 पैकी 14 आमदारांना निलंबनाची नोटीस पाठविली आहे. व्हिप पाळला नाही,याबाबत ही नोटीस पाठविली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांना निलंबनाची नोटीस पाठविली नाही.

सोमवारी बहुमत चाचणीमध्ये एकनाथ शिंदे यांनी 164 मत मिळविली होती तर त्यांच्या विरोधात 99 मते पडली होती. आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना का नोटीस पाठविली नाही यावरुनही चर्चा रंगू लागल्या आहेत.

याबाबत बोलताना भरत गोगावले म्हणाले की, आम्ही आदित्य ठाकरे  (Aditya Thackeray) यांना नोटीस बजाविली नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर करतो.याच कारणामुळे आम्ही आदित्य ठाकरे यांना नोटीस बजाविली नाही.दरम्यान, आता शिवसेनेच्या उर्वरीत आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सोमवारी शिवसेनेच्यावतीने सुनील प्रभू यांनीही व्हिप जारी केला होता. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मतदान करावं, असे त्यात म्हंटले होते. दुसरीकडे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनीसुध्दा व्हिप जारी करीत शिंदे यांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Todays Horoscope 5 July 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

कुणाचा व्हिप खरा

कुणाचा व्हिप खरा आणि कुणाचा खोटा यावरुन कायदेशीर लढा, शिवसेना लढणार आहे, अशी माहिती सुनील प्रभू यांनी दिली आहे.रविवारी विधीमंडळ सचिवालयांना एकनाथ शिंदे यांनाच गटनेता ठरवत अजय चौधरी यांच्या गटनेते पदाची मान्यता रदद् केली होती. त्यामुळे हा उध्दव ठाकरे यांच्यासाठी धक्का मानला जात होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.