Pune : आम्हीच झाडल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया- कळसकरची न्यायवैद्यकीय चाचणीत कबुली

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्याने मी व सचिन अंदुरे याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. कळसकरने सीबीआयच्या न्यायवैद्यकीय चाचणीत म्हटले आहे. ‘सीबीआय’कडून याबाबत मंगळवारी विशेष न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला.

शरद कळसकर याने न्यायवैद्यकीय चाचणीत त्याचे वकील संजीव पुनाळेकर यांचे सुद्धा नाव घेतले आहे. मागच्यावर्षी जून महिन्यात मी पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मला दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता अशी कबुली कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत दिला आहे. सीबीआयचे विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी मंगळवारी या अहवालाचा आधार घेऊन बाजू मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.