Khed : बहुळ येथे दहा वर्षाच्या चिमूकल्याचा विहिरीत पडून मृत्यू

एमपीसी न्यूज : शेतातील विहिरीतील पाण्यात पडून एका (Khed) दहा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील बहुळ येथे ही घटना घडली.

स्वराज सचिन वाडेकर ( वय 10, रा. बहुळ, ता. खेड ) असे विहिरीत पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. स्वराज याचे वडील सचिन वाडेकर यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

स्वराज हा आजोबासोबत सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. त्यानंतर अकरा वाजण्याच्या दरम्यान सचिन यांचे वडील शेतामधून घरी आले. तेव्हा स्वराज कुठे आहे, असे विचारले. त्यावेळी तो माघारी घरी आला आहे. असे त्यांनी सांगितले.

PMC : होर्डिंग मालकांना अहवाल सादर करण्याचे निर्देश; अन्यथा होणार कारवाई

मात्र, स्वराज हा शेतात कुठे ही दिसला नाही. त्यामुळे त्याचा अधिक शोध (Khed) घेतला असता लगतच असलेल्या एका विहिरीतील पाण्यावर पालथ्या अवस्थेत तो तरंगताना आढळून आला. त्याला उपचारासाठी नेले असता त्याला मयत घोषित करण्यात आले. दरम्यान, स्वराज याच्या आईचाही यापूर्वी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=oGFg0H0ED44

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.