Kiwale : मराठा आंदाेलकांचे किवळेत रस्ता राेको; पोलिसांनी घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, (Kiwale)या मागणीसाठी  किवळे-देहूराेड येथील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने आज (शुक्रवारी) किवळेत रस्ता राेकाे आंदाेलन केले. पोलिसांनी आंदोलकांना तत्काळ ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपाेषण सुरू केले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे त्यांचे उपोषण सुरू आहे.  जरांगे-पाटील यांची तब्येत नाजूक हाेत असताना सरकार त्यांच्या उपाेषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे.

Pune : लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करा – डॉ.सुहास दिवसे

जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी  किवळेत रस्ता राेकाे आंदाेलन (Kiwale)केले. यावेळी आंदाेलकांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी जाेरदार घाेषणाबाजी केली. यावेळी आंदाेलकांनी एक मराठा-लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही काेणाच्या बापाचे अशी जाेरदार घाेषणाबाजी करून परिसर दणाणून साेडला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.