Moshi : ठरलं! पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या मोशी येथील इमारतीचा भूमिपूजन सोहळा 3 मार्च रोजी होणार!

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या मोशी (Moshi) येथील इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचा मुहूर्त ठरला आहे. 3 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार असून आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती डेरे, न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर हे उपस्थित राहणार आहेत.

भूमीपूजनासाठी समारंभाचे अध्यक्ष म्हणून पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. के. महाजन असतील. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. न्यायसंकूलाच्या ईमारतीच्या बांधकामासाठी आमदार महेश लांडगे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच न्यायालयाच्या विविध मंजूरीसाठी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र उमाप यांनी विशेष प्रयल केले आहेत. भूमीपूजन सोहळ्याला महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

मोशी सेक्टर नं. 14 मधील 15 एकर जागेमध्ये पिंपरी चिंचवड येथील न्यायसंकूलाच्या ईमारतीच्या पहिला टप्प्यात 25 न्यायालये तयार होणार आहेत. त्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर – 12, वरिष्ठ स्तर- 7, जिल्हा व सत्र न्यायालय 6 व त्यास अनुसरून निवासस्थाने मंजूर झाली आहेत. या बांधकामासाठी 124.5 कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे. न्यायसंकूलाचे बांधकाम २४ महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे (Moshi) नियोजन आहे.

या न्यायसंकूलामुळे पिंपरी चिंचवड शहारातील नागरिकांना न्याय मागण्यासाठी पुणे न्यायालयामध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत. ख-या अर्थाने पिंपरी चिंचवड शहरातील पक्षकारांना या न्यायसंकुलाच्या माध्यामातून लवकरात लवकर न्याय मिळण्यास मदत होणार आहे असे पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रामराजे भोसले यांनी सांगितले.

Pune : प्रामाणिक करदात्यावर अन्याय करू नका – माजी नगरसेवकांची मागणी

न्यायसंकूलाच्या पाठपुराव्यासाठी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या सूचनेप्रमाणे सन 2016 साली बांधकाम समिती नेमण्यात आलेली होती. त्या समितीमध्ये अॅड. अतिश लांडगे, अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. सतीश गोरडे, अॅड. सुशील मंचरकर, अॅड. किरण पवार, अॅड. सुहास पडवळ यांनी वेळोवेळी न्यायालयीन व शासकीय पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता.

14 फेब्रुवारी 2024 रोजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, न्यायाधीश श्री सुनील वेदपाठक, न्यायाधीश के. एन. शिंदे यांनी मोशी येथील जागेची पाहणी करून भूमीपूजनाची जागा प्रस्तावीत केली आहे. यावेळेस महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अतिश लांडगे, अॅड. माजी अध्यक्ष सचिन थोपटे, अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. दिनकर बारणे तसेच पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. प्रतिक्षा खिलारी, सचिव अॅड. धनंजय कोकणे, सहसचिव अॅड. उमेश खंदारे, महिला सचिव अॅड. मोनिका सचवाणी, अॅड.संदीप तापकीर, सदस्य ऍड.फारूख शेख, अॅड. मिनल दर्शिले, अॅड. अस्मिता पिंगळे, अॅड. अय्याज शेख, अॅड. मंगेश खरावे, अॅड. संजय जाधव, अॅड. प्रसन्न लोखंडे हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.