Kondhwa : महमंदवाडी येथे इमारतीच्या अकराव्या मजल्यावर फ्लॅटला आग, सहा जणांची सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज –  उंड्री  येथील महमंदवाडी (Kondhwa) परिसरात एका इमारतीच्या 11 व्या मजल्यावर आग लागली आहे. ही आग आज (मंगळवार) दुपारी सव्वा एकच्या  सुमारास लागली. घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाची 5 वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. आग मोठी असून धुर मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि गच्चीवर रहिवाशी होते. घटनास्थळी शिडीचे वाहन व बी एसेट व्हॅन देखील दाखल झाली होती. 

अग्निशमन जवानांनी (1104 नंबर सदनिका) धुरामुळे प्रथम गच्चीवर असलेल्या सुमारे सहा रहिवाशांना 4 महिला 2 पुरुष) बी ए सेट परिधान करत सुखरुप ठिकाणी हलविले आणि पाण्याचा मारा सुरु केला. तसेच आग इमारतीत इतरत्र पोहोचणार नाही याची खबरदारी घेतल्याने मोठा धोका टळला. तसेच वेळीच दलाची मदत पोहोचल्याने आगीवर वेळेत नियंत्रण मिळवणे शक्य झाले.

Pune : महसुली कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना

सुमारे वीस मिनिटात जवानांनी आग नियंत्रणात आणत कुलिंग (Kondhwa) सुरू ठेवले. सदर सदनिकेमधील सर्व गृहपयोगी साहित्य पुर्ण जळाले असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सदनिकेत आग लागली त्यावेळी चार रहिवाशी होते. ते सर्वजण सुखरुप आहेत. सदर इमारतीत असणारी स्थायी अग्निशमन यंत्रणा बंद अवस्थेत होती.

या ठिकाणी आग मोठ्या स्वरूपात असल्याने 8 अग्निशमन वाहनांन सोबतच उंच शिडीचे वाहन व बीए सेट व्हॅन रवाना करण्यात आल्या. जवानांनी वेळेत आग विझवत मोठा धोका टाळला. त्या बाबत नागरिकांनी आभार मानले. अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे, समीर शेख, प्रमोद सोनावणे, पंकज जगताप, राजेश जगताप, सुभाष जाधव,  व इतर सुमारे 30 जवानांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.