Wakad : रुग्णालयांनी माफक दरात आरोग्यसेवा द्यावी – अश्विनी जगताप

एमपीसी न्यूज – रुग्णालयांनी सर्वसामान्य जनतेला माफक (Wakad )दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी. त्याच प्रमाणे रुग्णालयात शासनाच्या विविध योजना राबवून त्याचा नागरिकांना कसा फायदा होईल, याकडे लक्ष द्यावे, असे मत आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केले.

वाकड येथील लाइफ पॉइंट हॉस्पिटलच्या कॅथ लॅबचे( Wakad )उद्घाटन चिंचवडचे आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक ममता गायकवाड, रुग्णालयाचे संचालक हृदयरोग तज्ञ डॉ. राजीव शेटी , डॉ. राजेंद्र चव्हान, डॉ. प्रणव देशमुख, डॉ. महेश खारडे, कॅथ लॅब संचालक डॉ. विनायक गवळी, डॉ. राहुल सोनवणे, डॉ. शैलेश अडवाणी, कार्तिक भोसले, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. राकेश नेवे आदी या वेळी उपस्थित होते.

Pune : महसुली कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना

आमदार अश्विनी जगताप यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना रुग्णालयांनी नागरिकांना माफक दरात आरोग्य सेवा देण्याचे आवाहन केले. अनेक रुग्णांना चांगले उपचार मिळत नाहीत. शासनाच्या विविध योजना राबवून हॉस्पिटल प्रशासनाने सर्व स्तरातील रुग्णांना सेवा देण्यासाठी समाविष्ट करावे, असेही त्या म्हणाल्या.

उद्घाटनानंतर डॉक्टरांनी अँगिओग्राफी, अँजिओप्लास्टी, टू डी इको , स्पेस मेकर, स्ट्रेस टेस्ट इत्यादी सेवा कशा पद्धतीने देणार या बाबत माहिती दिली. रुग्णालयात कोणत्या योजना राबविणार याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.