City Cup 2021 : केपी इलेव्हन, स्निग्मय उपांत्य फेरीत

एमपीसी न्यूज – केपी इलेव्हन आणि स्निग्मय एफसी संघांनी सहज विजय मिळवून सिटी कप 2021 फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सिटी एफसी पुणे संघाने मोशी येथील मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

पहिल्या उपांत्यपूर्व लढतीत केपी इलेव्हन संघाने पिछाडीवरून ब्ल्यू स्टॅग संघावर 4-1 असा विजय मिळविला. दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत स्निग्मय एफसी संघाने आयफा संघाचा एकतर्फी लढतीत 4-0 असा पराभव केला.

केपी इलेव्हन आणि ब्ल्यू स्टॅंग संघातील सामना मध्यंतराला गोलशून्य बरोबरीत होता. दोन्ही संघांकडून गोल करण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत, उत्तरार्ध मात्र वेगवान झाला. कैलाश परदेशी याने 35व्या मिनिटाला आपल्याच संघावर गोल करून ब्ल्यू स्टॅगला आघाडीवर नेले.

विशेष म्हणजे केपी इलेव्हन संघालाही स्वयं गोलमुळेच बरोबरी साधता आली. सामन्याच्या 46व्या मिनिटाला अनिकेत गेन याने बचावाच्या नादात चेंडू आपल्याच जाळ्यात मारला. या स्वयंगोलने केपी इलेव्हनला बरोबरी साधता आली. त्यानंतर अखेरच्या पाच टप्प्यात कमालीचा वेगवान खेळ करत त्यांनी सामना ब्ल्यू स्टॅगच्या हातून काढून नेला. याच अल्फ्रेड नेगल याने 57व्या, पुढे 59 आणि 62व्या मिनिटाला निर्मल छेत्रीने गोल करून केपी इलेव्हनचा विजय साकार केला.

दुसऱ्या सामन्यात स्निग्मय एफसी संघाने आयफाचे आव्हान अगदीच किरकोळीत संपुष्टात आणले. हेमराज हुडा याने 12व्या मिनिटाा स्निग्मय संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर संग्राम पाटिल याने 45 आणि 55व्या मिनिटाला दोन गोल केले. सामन्याच्या 62 व्या मिनिटाला प्रतिक साबळे याने गोल करून स्निग्मयचा एकतर्फी विजय साकार केला.

निकाल –

  • केपी इलेव्हन 4 (अनिकेत गेन (स्वयं गोल 46वे), अल्फ्रेड नागर 57वे, निर्मल छेत्री 59 आणि 60+2वे मिनिट) वि.वि. ब्ल्यू स्टॅग (कैलाश परदेशी स्वयंगोल 35वे मिनिट)
  • स्निग्मय एफसी (हेमराज हुडा 12वे, संग्राम पाटिल 45वे, 55वे, प्रतिक साबळे 62वे मिनिट) वि.वि. आयफा 0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.