Lonavala : कामगार नेते विजय पाळेकर यांचा हजारो कामगारांसह भाजपात प्रवेश

एमपीसी न्यूज – शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस व लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष कामगार नेते अॅड विजयराव पाळेकर यांनी आज हजारो कामगारांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपाचे केंद्रियमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत वडगाव मावळ येथील बुथप्रमुखांच्या विजयी मेळाव्यात हा प्रवेश करण्यात आला.

यावेळी कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, जयश्री आहेर, बाळासाहेब जाधव, रमेश पाळेकर, सुनील शेळके, रवींद्र भेगडे व मान्यवर उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

शिवक्रांती कामगार संघटनेचे महाराष्ट्रात मोठे प्रस्त असून 175 युनिटमध्ये संघटनेचे सुमारे पावणेदोन लाख कामगार आहेत. तळेगाव, चाकण, कान्हे, नवलाख उंब्रे औद्योगिक वसाहतीमध्ये तसेच परिसरात त्यांचे मोठ्या प्रमाणात कामगार आहेत. जवळपास आठ ते नऊ हजार कामगार हे मावळचे मतदार असल्याने पाळेकर यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपाने मोठी वोट बँक तसेच कामगार क्षेत्र ताब्यात घेतले आहे. पाळेकर यांना पक्षात योग्य तो मानसन्मान व पद देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे व जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिले. त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नेते गुलाब मराठे, रवींद्र साठे, राजेंद्र पवार आदी कामगारनेत्यांनी पक्ष प्रवेश केला. तसेच कांब्रे येथील देवा गायकवाड व पाचशे युवा कार्यकर्ते मनसेचे अरुण शिंदे, तानाजी शेंडगे अशा शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.

प्रवेशा विषयी बोलताना विजय पाळेकर म्हणाले मावळ व चाकण परिसरात कारखानदारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कामगारांचे प्रश्न मोठे आहेत, त्यातच सुदैवाने कामगार राज्यमंत्रीपद मावळात असल्याने कामगार हिताला प्राधान्य देण्याला मोठे पाठबळ मिळणार असल्याने कामगार हिताला प्राधान्य देत भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.