Lonavala : लोणावळ्यातील ‘उबाठा’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे ( Lonavala)  उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत लोणावळ्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे ( ‘उबाठा’) पक्षाच्या काही  पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी (बुधवारी) शिवसेनेत प्रवेश केला.

खासदार बारणे यांच्या प्रचारासाठी लोणावळा येथे महायुतीच्या घटक पक्षांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, युवा सेना प्रमुख विवेक भांगरे, महिला आघाडी प्रमुख मनीषा भांगरे, मुस्लिम बँकेचे संचालक जाकीर खलिफा, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष कमलसिंग म्हस्के, माजी नगरसेवक देविदास कडू, तसेच सुनील हागवणे, राम सावंत, दत्ता चोरगे, विशाल हुलावळे, सुधाताई सोमण आदी पदाधिकारी उपस्थित ( Lonavala)  होते.

LokSabha Elections 2024 :  उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना ‘ही’ काळजी घ्यावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

उबाठा सेनेचे माजी विभागप्रमुख विशाल पाठारे, माजी शाखाप्रमुख नरेश घोलप, उद्योजक नंदू कडू तसेच संजय पडवळ, संतोष शिंत्रे, विजया पाटेकर, पद्मजा पूलरवार यांनी खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये महिला आघाडीच्या आयेशा शेख, सोनाली गायकवाड, शांता कुडेल, निर्मला लोकरे, सुनंदा नायडू, लक्ष्मी नाटेकर, वंदना शिंदे, नंदा शिंदे, पिंकी पाटील, प्रियंका खांडेकर फातिमा शेख संगीता शिंदे, फैमिदा शेख, शोभा भालेराव, कोमल सुतार, रोमाना शेख, उषा सकट यांचा समावेश आहे.

युवा सेनेत ऋषिकेश दाहोत्रे, रितेश साठे, यश धडवले, सुधांशू शेलार, निहाल दळवी, प्रथमेश भालेराव, आदित्य पिलाने, सुहास कदम, प्रथमेश कुडतडकर, आदित्य साबळे, राजू जाधव, आसिम पटेल , वरुण चव्हाण , रितेश कुडतडकर, पियूष नामदेव,
राकेश सकट, नितीन साठे, अशोक लोहिरे, विजय साठे, मिलींद साळुंखे यांनी प्रवेश केला. यावेळी त्यांना विविध पदांची नियुक्तीपत्रेही देण्यात आली. उत्तर भारतीय आघाडीच्या दिलीप दुबे, गौरव दुबे, सौरभ दुबे, संजय वर्मा, राजा वर्मा, राकेश वर्मा, शिवा सिंग प्रमोद सिंग ब्रह्मदेव पासवान राम पासवान रामप्रकाश ए के दुबे उमेश आगमाळे, संतोष भोंडे कमलेश पाल, वीरेन बैदा, विकास शुक्ला, हरीशंकर वर्मा, बाळू ओव्हाळ, श्रेयस दुबे, सुरेश कुदळे, प्रदीप समेळ, मंगेश दंत, साहिल दंत, प्रसाद दंत, सुजित झा, मनोज पासवान, प्रवीण मिश्रा, किरण जांभुळकर, अनिल नरडे यांनीही शिवसेनेत प्रवेश ( Lonavala)  केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.