Pune News : म्हाडाच्या 4222 घरांसाठी 7 जानेवारीला सोडत, अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ

एमपीसी न्यूज : म्हाडाच्या घरासाठी ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पुणे म्हाडाच्या वतीने येत्या 7 जानेवारी रोजी 4222 घरांची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी म्हाडाची ही जाहिरात आली होती. यातील 4222 घरांसाठी तब्बल 64 हजार 715 लोकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इतिहास 7 जानेवारी रोजी सोडतीचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीत हा कार्यक्रम होणार आहे. 

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ ‘म्हाडा’ची ही आठवी ऑनलाईन सोडत आहे. म्हाडाच्या विविध योजनतील 2823 सदनिका व 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत 1399 सदनिका असे मिळून एकूण 4 हजार 222 घरांसाठी येत्या सात जानेवारीला सोडत होणार आहे.

या 4 हजार 222 घरांसाठी अर्ज दाखल करण्याचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्त झाला होता. आता येत्या सात जानेवारीला सोडत देखील अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.