Pimpri : शर्वी व आर्या दोन चिमुरड्यांनी तैलबैला किल्ल्यावर यशस्वी चढाई

एमपीसी न्यूज – सह्याद्रीच्या पर्वत रांगात चढाईसाठी कोणताही मार्ग नसलेला कातळकडेचा खडतर तैलबैला किल्ला पिंपरी-चिंचवडमधील शर्वी लोळगे व आर्या मोरे या चिमुरड्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय भवानी-जय शिवाजी’ चा जयघोष करत सर केला आहे. कातळकडेचा हा खडतर किल्ला नेहमीच गिर्यारोहकांना आकर्षित करत असतो. त्यातच पिंपरी-चिंचवडमधील शर्वी मनोहर लोळगे व आर्या विलास मोरे या दोन चिमुरड्यांनी तैलबैला किल्ला सर केला.

या मोहिमेबाबत बोलताना मनोहर लोळगे म्हणाले, साई ग्रुपचे आधारस्तंभ आणि गरुड गणपती मंडळाचे अध्यक्ष सुनील कुंजीर यांच्या वाढदिवसानिमित्त तैलबैल ट्रेकचा बेत केला. या मोहिमेचे मुख्य आकर्षण म्हणजे शर्वी (वय वर्षे ७) व आर्या (वय वर्षे ११) या दोन चिमुरड्यांनी हा किल्ला सर केला. पहिला टप्पा ४० ते ५० फूट असा होता तर त्यात ७० टक्के खडी चढाई असा कठीण व दुसरा टप्पा निमुळत्या वाटणे कड्याच्या कडेने ७० फूट असा होता. चढाई व उतरणे यासाठी प्रस्तारोहण व रॅपलिंग तंत्र वापरावे लागते. अशा परिस्थितीत टीम माथ्यावर पोहोचून यशस्वी केली. या दोन चिमुरड्यांनी महिला कशामध्येही मागे नाहीत, हे सिद्ध केले.

या मोहिमेचे नेतृत्व मनोहर लोळगे यांनी केले. गावडू पाटील, विलास मोरे, सुनील कुंजीर, सुहास रांजणे, अभिजित उभे, निलेश मडके, रवी साटाले, भूषण शिंदे, विकास गाडे, अजिंक्य कुंजीर, प्रताप रांजणे, पियुष लोळगे, वरद मोरे, संतोष माळवदे, चेतन गांदले, नाना पाटील, सचिन चौगुले, प्रशांत कोमकुल, केदार धनवटे, साई ग्रुप व सह्याद्री अॅडव्हेंचर आदींनी परिश्रम घेतले. 

"rope

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.