Wakad : काळेवाडी येथे तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – बहिणीच्या शोधात आईसोबत चाललेल्या तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना काळेवाडी येथे घडली. याबाबत 22 वर्षीय तरुणीने पंजनाथन कृष्णन (वय 50) मारिया पंजनाथन कृष्णन (वय 29, दोघेही रा. काळेवाडी) यांच्याविरोधात फिर्याद नोंदविली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणी आपल्या आईसोबत बहिणीच्या शोधात काळेवाडी येथे जात असताना दोन इसमांनी घरगुती भांडणाच्या कारणावरून तिचा विनयभंग केला. तसेच क्रूरतेचा कळस गाठत आरोपीने पीडितेच्या शरीराचा चावा घेतला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. 

 
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.