Lonavala : सिंहगड कॉलेजच्या हॉस्टेल मधून महागडा मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – सिंहगड कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमधून विद्यार्थ्याचा महागडा मोबाईल फोन चोरीला गेला. याप्रकरणी लोणावळा (Lonavala) ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली.

Bhosari : तब्बल 62 दुकाने परस्पर नावावर करून घेत 11 कोटी 23 लाखांची फसवणूक

दीपक दत्तात्रय इंगळे (वय 18) यांनी याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंगळे हे लोणावळा जवळ कुसगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. ते कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये राहतात. 25 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीतून त्यांचा 49 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला. लोणावळा (Lonavala) ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.