Lonavala : लोणावळा ग्रामीण व शहर परिसरात हुक्का पार्लरवर छापा, 93 हजारांचा मुद्देमाल जप्त

एणपीसी न्यूज – लोणावळा शहर, तसेच ग्रामीण भागात बेकायदा हुक्का पार्लरवर ( Lonavala ) पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांच्या पथकाने छापा दरम्यान 93 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.17) मध्यरात्री केली.

याप्रकरणी रुस्तम वकील अहमद (वय 20), रोशन मनोज यादव (वय 30), कृष्णा नाथ राठोड (वय 31, तिघे रा. लोणावळा), प्रताप कृष्णा डिंबळे (वय 42 ,रा. कार्ला), बिपीन परमेश्वर महातो (वय 30, रा. उल्हासनगर, ठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Chakan : चाकणला कांद्याच्या आवकेत वाढ पण दरात झाली घसरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा शहरातील हॉटेल युटोपिया, हॉटेल कुमार रिसॉर्ट, तसेच ग्रामीण भागातील हॉटेल बैठक येथे बेकायदा हुक्का पार्लर चालविण्यात येत असल्याची माहिती लोणावळा विभागाचे उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातली असून, बंदी आदेश झुगारून बेकायदा हुक्का पार्लर चालविण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमधील ग्राहकांना हुक्का उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आले.

ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शुभम चव्हाण, रोहन पाटील, अंकुश नायकुडे, सचिन गायकवाड, सुभाष शिंदे, अंकुश पवार, गणेश येळवंडे यांनी ही ( Lonavala ) कारवाई केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.