Chakan : चाकणला कांद्याच्या आवकेत वाढ पण दरात झाली घसरण

एकूण उलाढाल 7 कोटी, 60 लाख रुपये

एमपीसी न्यूज –  खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये बटाटा, हिरवी मिरची व कोबीचे भाव कडाडले( Chakan)  आहेत. कांद्याची आवक वाढल्याने भाव गडगडले. बटाट्याची आवक वाढूनही भावात वाढ झाली. लसणाची आवक घटूनही भावात घट झाली. फळभाज्यांच्या बाजारात कोबी, वाटाणा व गाजराची किरकोळ आवक झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू व पालक भाजीची आवक घटल्याने भाव तेजीत राहिले. जनावरांच्या बाजारात जर्शी गाईची संख्या घटूनही भाव स्थिर राहिले. बैल, म्हैस व शेळ्या – मेंढ्या यांच्या संख्येत वाढ होऊनही भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल 7 कोटी, 60लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 20  हजार 500 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 500 क्विंटलने वाढल्याने भावात 100 रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव 1800  रुपयांवरून 1700  रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1750 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 750  क्विंटलने वाढून भावात 200 रुपयांची वाढ झाली.

बटाट्याचा कमाल भाव 2000 रुपयांवरून 2200 रुपयांवर पोहोचला. जळगाव भुईमुग शेंगा व बंदूक भूईमुग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 30 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ३ क्विंटलने घटून भावात 1  हजार रुपयांची घसरण झाली. लसणाचा कमाल भाव 17 हजार रुपयांवरून 16 हजार रुपयांवर  स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 325  क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 65  क्विंटलने घटल्याने भावात वाढ झाली. हिरव्या मिरचीला 5 हजार रुपयांपासून ते 7  हजार रुपयांपर्यंत भाव ( Chakan)  मिळाला.

Chinchwad : माध्यम स्वातंत्र्य व भविष्यातील पत्रकारिता या परिसंवादातून उलगडली पत्रकारितेची सद्य परिस्थिती

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –
कांदा – एकूण आवक – 20, 500  क्विंटल. भाव क्रमांक 1. 1700  रुपये, भाव क्रमांक 2 . 1500  रुपये, भाव क्रमांक 3 . 1000  रुपये.
बटाटा – एकूण आवक – 1750  क्विंटल. भाव क्रमांक 1. 2, 200 रुपये, भाव क्रमांक 2 . 1600  रुपये, भाव क्रमांक 3 . 1400  रुपये.

फळभाज्या –
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –
टोमॅटो – 290 क्विंटल ( 1000  ते 1500 रू. ), कोबी – 180 क्विंटल ( 1400 ते 1600  रू.), फ्लॉवर – 210  क्विंटल ( 900 ते 1200 रु.), वांगी – 66 क्विंटल ( 2000 ते 3000 रु.), भेंडी – 83  क्विंटल ( 3000 ते 4000 रु.), दोडका – 64 क्विंटल (4000 ते 5000 रु.), कारली – 76  क्विंटल ( 3000 ते 4500 रु.), दुधीभोपळा – 62  क्विंटल ( 1000 ते 2000 रु.), काकडी – 92  क्विंटल ( 1000 ते 2000 रु.), फरशी – 43  क्विंटल ( 3000 ते 5000 रु.), वालवड – 47 क्विंटल ( 3000 ते 5000 रुपये), गवार – 42  क्विंटल ( 5000 ते 7000 रुपये, ), ढोबळी मिरची – 170  क्विंटल ( 3000 ते 5000 रु.), चवळी – 34  क्विंटल ( 2000 ते 3000  रु.), वाटाणा – 190  क्विंटल ( 5000  ते  6000 रु.), शेवगा – 53 क्विंटल ( 3000  ते 4000 रु.), गाजर – 200 क्विंटल ( 1500  ते 2000 रु.)

पालेभाज्या –
चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे –
मेथी – एकूण 10 हजार 100 जुड्या ( 1200 ते 1700 रुपये,), कोथिंबीर – एकूण 21  हजार 200  जुड्या ( 800 ते 1200 रुपये,), शेपू – एकूण 2  हजार 300 जुड्या ( 800 ते 1000 रुपये ), पालक – एकूण 3 हजार 400 जुड्या ( 700 ते 1000 रुपये),.

जनावरे –
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 45 जर्शी गाईपैकी 42 गाईची विक्री झाली. ( 15000 ते 70000रु.), 130 बैलांपैकी 90  बैलांची विक्री झाली. (10000 ते 40000 रु.), 190  म्हशीपैकी 170 म्हशींची विक्री झाली.( 30000 ते 80000रु.), 10  हजार 800 शेळ्या – मेंढ्यापैकी 10, 450  शेळ्यांची विक्री झाली. ( 2000  ते 25,000रु.),.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.