Chinchwad : माध्यम स्वातंत्र्य व भविष्यातील पत्रकारिता या परिसंवादातून उलगडली पत्रकारितेची सद्य परिस्थिती

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शनिवारी (दि.16) चिंचवड (पुणे) येथे राज्यस्तरीय पत्रकार (Chinchwad)  अधिवेशन संपन्न झाले. यावेळी ‘अमृतकाळातील माध्यम स्वातंत्र्य, भविष्य आणि पत्रकारितेतील राम’ परिसंवादातून सध्या पत्रकारिता कोणत्या पातळीवर आहे याबबत उहापोह करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्धाटन संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्‍वास आरोटे,उपाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पराग कुंकुलोळ,  ज्येष्ठ लेखक अरविंद जगताप तसेच ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, महेश म्हात्रे, मंदार फणसे, आशिष जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली .याप्रसंगी असंघटित कामगारांचे नेते समाजसेवक बाबा आढाव , भोसरी मतदार संघाचे आमदार महेश लांडगे, शिरूर मतदारसंघाचे मा. खासदार डॉ.अमोल कोल्हे , आमदार उमा खापरे,राजकीय विश्‍लेषक उदय निरगुडकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर,नगरसेवक मोरेश्वर भोंडवे,चेतन भुजबळ, वैभव स्वामी आदी उपस्थित (Chinchwad)  होते.

यावेळी पत्रकारांची एकजूट निर्माण करणे यासाठी संघटना कार्यरत असते. तसेच या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे, तसेच माध्यमांनी प्रश्न मांडत असताना काही महत्वाच्या गोष्टीचे भान ठेवणे, पत्रकारांवर कोणकोणत्या प्रकारचे दबाव असतात? शेतकरी, कामगार, सामान्य नागरिक यांचे प्रश्न माध्यम निष्पक्ष मांडतात का? यावर चर्चा झाली.तर उपस्थित राजकीय पाहुण्यांनी पत्रकारांना, बातमी व जाहिरातीमध्ये सरमिसळ न करता लेखणी मजबूत करा, सर्वसामान्यांची बातमी म्हणजे वर्तमानपत्र ही वर्तमानपत्राची ओळख असायला हवी, असा सल्ला दिला.

Chinchwad : कविता हा अंतर्मनातील भावनेचा आविष्कार असतो- वि. ग. सातपुते

यावेळी  हिना कौसरखान,आश्‍वासन पत्रकारिता पुरस्कार रवींद्र आंबेकर,उत्कृष्ट पत्रकारिता दिनेश केळुसकर, युध्दवार्ता पत्रकारिता विनोद राऊत, आरोग्य पत्रकारिता संतोष आंधळे,प्ररणादायी पत्रकारिता सतीश नवले, अभिव्यक्ती पत्रकारिता सचिन चपळगावकर, कृषि पत्रकारिता विनोद इंगोले, जिजाऊ पत्रकारिता सुमित्रा वसावे, सद्रक्षणाय पत्रकारिता वैभव सोनवणे, आदर्श पत्रकारिता प्रविण बिडवे, एकलव्य पत्रकारिता प्रकाश बेळगोजी, शोध पत्रकारिता रोहित आठवले, उत्कृष्ट पत्रकारिता सागर आव्हाड, निर्भिड पत्रकारिता अमोल काकडे तसेच वाशिम रत्न पत्रकारिता निलेश सोमाणी,

उत्कृष्ठ पत्रकारिता अमोल यलमार, उत्कृष्ट संघटक दशरथ चव्हाण (नवी मुंबई), नयन मोंढे (अमरावती), नितीन शिंदे (ठाणे), महेश पानसे (नागपूर), रमजान मन्सुरी (गुजरात), शिवाजी नेहे (गोवा), राजश्री चौधरी (दिल्ली), किशोर रायसाकडा (जळगाव), रोहिदास गाडगे (पुणे ग्रामीण), भूषण महाजन (जळगाव), शैलेश पालकर (रायगड), राजेंद्र कोरके (पंढरपूर), स्वामी शिरकूल (मुंबई), आरोग्य पत्रकारिता बाबा देशमाने, उपक्रमशील पत्रकारीता प्रभु गोरे (औरंगाबाद), वैभव स्वामी (बीड), आनंद शर्मा (नागपूर), प्रविण सपकाळे (जळगाव), प्रताप मेटकरी (सांगली),, प्रदीप शेंडे (नागपूर), आबा खवणेकर (सिंधुदूर्ग), पोपट गवांदे (नाशिक) यांचा पुरस्कार देऊन (Chinchwad)  गौरव करण्यात आला .

कार्यक्रमाचे नियोजन संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्‍वासराव आरोटे, उपाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पराग कुंकुलोळ, उपाध्यक्ष अतुल क्षीरसागर, महादेव मासाळ, सचिव जमीर सय्यद, कार्याध्यक्ष औदुंबर पाडूळे, खजिनदार मिलींद संधान तसेच अ‍ॅढ.संजय माने, योगेश गाडगे, विजय जगदाळे, विकास शिंदे, बेलाजी पात्रे, प्रमोद सस्ते, प्रसाद वडघुले, सागर झगडे,शशिकांत जाधव, प्रकाश लोखंडे, सुनील बेणके, संजय भेंडे, संदीप सोनार आदींनी केले.

सूत्रसंचालन अश्विनी सातव व अतुल क्षीरसागर यांनी केले.मिलिंद संधान, सागर झगडे यांनी आभार (Chinchwad) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.