Chinchwad : कविता हा अंतर्मनातील भावनेचा आविष्कार असतो- वि. ग. सातपुते

एमपीसी न्यूज – कविता लिहिता येणं ही साक्षात भगवंताची कृपा आहे . ( Chinchwad) आपल्या घरातील ज्येष्ठांनी घडवलेले संस्कार, आपल्याला लाभलेला सहवास कवितेतून व्यक्त होत असतो, असे मत ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. सातपुते यांनी व्यक्त केले आहे.

सावरकर सदन येथे काव्यानंद प्रतिष्ठान आयोजित स्व. चिंतामणराव पोटे काव्यमित्र पुरस्कार 2023 वितरण प्रसंगी अध्यक्ष म्हणून वि. ग. सातपुते बोलत होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पिंपरी चिंचवड साहित्य मंचचे राजेंद्र घावटे हे लाभले होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नवयुग साहित्य व शिक्षण मंडळाचे राज अहेरराव उपस्थित होते.

Pune : बसच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काव्यानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनिल खंडेलवाल यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखिका सौ.वंदना ताम्हाणे यांनी केले. काव्यानंदचे सचिव विवेकानंद पोटे यांनी गणेश वंदना तर भाग्या खंडेलवाल हिने गुरुवंदना सादर केली. स्व. चिंतामराव पोटे काव्यमित्र पुरस्कार 2023 हा पुणे येथील कवयित्री सौ. आरुशी दाते यांना प्रदान करण्यात आला.

काव्यानंद प्रतिष्ठान तर्फे प्रकाशित मराठी भाषा गौरव दिन विशेषांकाचे प्रकाशन ही यावेळी करण्यात आले. कविवर्य सुभाष धाराशिवकर यांच्या शब्द दिंडीतला वारकरी व अक्षर बंध या दोन्ही काव्यसंग्रहाचे आणि कवयित्री भाग्यश्री मोडक यांच्या भावशिल्प या काव्य संग्रहाचे प्रकाशन यावेळी संपन्न झाले.

कार्यक्रमाची सांगता पसायदान गायनाने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल शेळके, समीर मुल्ला व वंश खंडेलवाल ( Chinchwad) आदींनी सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.