Lonavala : टँकर अपघात प्रकरणी आणखी एकाचा मृत्यू; अखेर टँकर चालकाने उपचारादरम्यान सोडले प्राण

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Lonavala) इथेनॉल घेऊन जाणाऱ्या टँकरला मंगळवारी (दि. 13) अपघात झाला आणि टँकर पेटला. यामध्ये टँकर चालक गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

नितीन सुखदेव सत्रे (वय 32, रा. मोगराळे, ता. मान, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या टँकर चालकाचे नाव आहे. यापूर्वी सविता कैलास वरे (वय 34), कुशल कैलास वरे (वय 8) या मायलेकरांचा तर सविता वरे यांचा भाचा रितेश महादू कोशिरे (वय 18) या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह जनार्दन बापूराव जाधव (वय 60, रा. घाटकोपर, मुंबई), गणेश एकनाथ कोळसकर (वय 39, रा. अंधेरी, मुंबई) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

मंगळवारी (दि. 13) सकाळी 11.30 वाजता पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर इथेनॉल वाहतूक करणाऱ्या एका टॅंकरला (एमएच 42/बीएफ 9979) अपघात झाला. टॅंकरला आग लागण्याची घटना घडली त्यावेळी सविता वरे त्यांच्या मुलाला आणि भाच्याला घेऊन लोणावळा येथून राजमाचीच्या दिशेने दुचाकीवरून जात होत्या.

Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शाळेची पहिली घंटा वाजली

कुणेगाव येथे पुलाखाली आल्या असता त्यांच्या अंगावर पुलावर (Lonavala) पेटलेल्या टँकरमधील इथेनॉल सांडले. त्यामुळे तिघेही गंभीररीत्या भाजले गेले. त्यात कुशल वरे आणि रितेश कोशिरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सविता यांना पुण्यातील ससून रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

टॅंकरमधील दुसरा प्रवासी चंद्रकांत आप्पा गुरव आणि पुलाखाली उभ्या असलेल्या इनोव्हाचा चालक गणेश एकनाथ कोळसकर हे दोघेजण देखील गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी इनोव्हा चालक गणेश कोळसकर याचा बुधवारी सकाळी मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.