Alandi : पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे आळंदीकरांना उशिराने होणार पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज : आळंदी शहरास पाणीपुरवठा (Alandi) करणारी पुणे महानगरपालिकेची 1700 एमएम पाईपलाईन लिकेज झाली. यामुळे गुरुवारी आळंदी शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. या दरम्यान सदर पाईपलाईन लिकेज काढण्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु, हे काम मोठ्या स्वरूपात असल्यामुळे या कामास विलंब होणार असून पाणीपुरवठा उशिरा होणार आहे. 

लिकेजचे काम दुपारी 3 पर्यंत पूर्ण होण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय काम पूर्ण झाल्यानंतर कुरळी येथील केंद्रावर पाणी पोहोचण्यास सुमारे 4 तास कालावधी लागणार आहे. त्यानंतर आळंदी येथे पाणी पोहोचण्यास सुमारे अर्धा तास कालावधी लागेल.

Lonavala : टँकर अपघात प्रकरणी आणखी एकाचा मृत्यू; अखेर टँकर चालकाने उपचारादरम्यान सोडले प्राण

वरील (Alandi) शक्यतेनुसार काम सुरळीत पार पडल्यास आळंदी शहरात भामा आसखेड वरून पाणी येण्यास साधारणतः सायंकाळी साडे सात ते आठ वाजण्याची शक्यता आहे. त्यानंतर नियमाप्रमाणे गावठाणचे टप्पे सुरू करण्यात येणार असून सदर कामामुळे उशिरा पाणी पुरवठा होत असल्याची माहिती  आळंदी नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग प्रमुख शीतल जाधव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.