Water supply : लष्कर जलकेंद्रावर अधारीत परिसरात रविवारी होणार कमी दाबाने पाणी पुरवठा

एमपीसी न्यूज – पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्र कडे जाणारी 1 हजार 600 मि.मी. व्यासाच्या जलवाहीनीमध्ये गळती असल्याचे समोर आले आहे. (Water supply) या पाईपलाईनच्या तातडीची रविवारी (दि.16)  दुरुस्ती करण्यात येणार आहे. या जलकेंद्रावर अधारीत परिसरात रविवारी पाणीपुरवठ्यासाठी पुणे महापालिकेने पर्यायी व्यवस्था केली असून मात्र ते पाणी कमी दाबाने येणार आहे.

Unauthorized construction : कोंढवा येथे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई

या लाईन मधून खालील भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो

लकर पाणीपुरवठा विभागाकडील बी.टी. कवडे रोड, भीम नगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगाव पार्क संपुर्ण हडपसर इंडस्ट्रियल एरिया, मुंढवा, केशवनगर, माळवाडी, मगरपट्टा, सोलापूर रोड डावी बाजु, 15 नंबर आकाशवाणी, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, काळेपडळ, ससाणेनगर, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यदनगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकरमठ, वैदुवाडी, आनंदनगर, (Water supply) रामनगर, वानवडी, साळुंके विहार, आझादनगर, जगताप चौक परिसर, जांभुळकर मळा, सोलापूर रोड उत्तर बाजू, एस. व्ही. नगर, शांतीनगर, काळेपडळ, हांडेवाडी रोड, महंमदवाडी गाव, तरवडे वस्ती, कृष्णानगर, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपुर्ण पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्द, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु.शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी पार्ट, संपुर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव,एन. आय. बी. एम. रोड, रेसकोर्स इत्यादी.

पर्यायी व्यवस्था केली असली तरी पाणी कमी दाबाने येणार आहे.(Water supply) त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.