LPG Cylinder : व्यावसायिक गॅस सिलेंडर 25 रुपयांनी महागला

एमपीसी न्यूज-  व्यावसायिक गॅस दर पुन्हा वाढले ( LPG Cylinder)  असून हा  सिलेंडर 25 रुपयांनी महागला आहे. मागच्या महिन्यात 1 फेब्रुवारी रोजीही गॅस सिलेंडर पुरवठादार कंपन्यांनी व्यावसायिक  सिलेंडर्सच्या किमती वाढवल्या होत्या. 1 फेब्रुवारी रोजी 14 रुपयांनी या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. आता पुन्हा त्यात 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Budget : आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार देशाचा अर्थसंकल्प

एक मार्चपासून व्यावसायिक वापराच्या 19 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये तब्बल 25 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता या सिलेंडर्सचे दर दिल्लीमध्ये 1795 रुपये तर मुंबईत 1749  रुपयांवर गेले आहेत. चेन्नई व कोलकात्यामध्ये हेच दर अनुक्रमे 1960 आणि 1991 रुपये इतके झाले आहेत.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.गेल्या  6 महिन्यांपासून घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत स्थिर आहे. यामध्ये शेवटचा बदल 30 ऑगस्ट रोजी झाला ( LPG Cylinder)  होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.