Shivraj Singh Chouhan : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना कोरोनाची लागण 

Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chavan contracted corona

एमपीसी न्यूज – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आज सकारात्मक आला आहे.

शिवराज सिंग चव्हाण यांनी आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याचे ट्विटरवरून सांगितले आहे. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली चाचणी करून घ्यावी अथवा त्यांनी क्वारंटाईन व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोनाचा वेळेवर ईलाज केला की रुग्ण पूर्ण बरा होतो. तसेच 25 मार्च पासून कोरोना परिस्थिती चा आढावा मी बैठकीद्वारे घेत आहे यापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा आढावा घेणार असल्याचे त्याने ट्विटमध्ये सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.