Pimpri: कोरोनाचा सर्वाधिक युवकांना विळखा; बाधित युवकांचे प्रमाण 40 टक्क्यांवर

The proportion of infected youth is at 40 percent

एमपीसी न्यूज – कोरोनाचा सर्वाधिक धोका वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना मानला जात आहे. पण, लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण युवकांना आहे. कोरोनाने युवकांना अक्षरश: विळखा घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 22 ते 39 या वयोगटातील 5934 युवकांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण तब्बल 40.20 टक्के आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून युवकांच्या मृत्यूत देखील वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शहरातील 14 हजार 760 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक युवकांमध्ये आहे.

शहरातील 22 ते 39 वयवर्ष असलेल्या तब्बल 5934  युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. त्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 40.20 टक्के आहे. त्याखालोखाल 40 ते 59  वयवर्ष असलेल्यांन लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 4244 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्याचे प्रमाण 28.75 टक्के आहे.

त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 1521 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे.  त्याचे प्रमाण 10.30 टक्के आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 1331 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचे प्रमाण 9 टक्के आहे.  याशिवाय 60 वर्षापुढील बाधितांची संख्या 1720 वर पोहोचली आहे.  त्याचे प्रमाण 11.65 टक्के आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.