Corona : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  कोरोनामुळे 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा (Corona) 14 एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे. या महिलेला कोरोनासह मधुमेह, उच्च रक्तदाब व संधिवात हे जुने आजार होते.

पिंपरी-चिंचवड शहरात 164 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 2 जण रुग्णालयात दाखल आहेत.  तर, गृह विलगीकरणात 162 रुग्ण आहेत.  1 जानेवारी 2023  पासून दोघांचा मृत्यू झाला आहे. (Corona) ही 75 वर्षीय वयोवृद्ध महिला दोन्ही गुडघ्यांचे प्रत्यारोपण करण्याकरीता 9 एप्रिल रोजी खासगी रुग्णालयात दाखल झाली होती.  10 एप्रिल रोजी दोन्ही गुडघ्यांचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यानंतर 12 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल असताना रुग्णास श्वसनाचा त्रास होऊ लागला. 13 एप्रिल रोजी कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आणि 14 एप्रिल रोजी मृत्यू झाला.

Akurdi : प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पावसाळ्यात होणार पूरस्थितीचा धोका – इखलास सय्यद

कोरोना आजारास घाबरून जाऊ नये. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप इ. लक्षणे असल्यास त्वरीत नजीकच्या महापालिकेच्या दवाखाना/ रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोनाची तपासणी करून घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे किंवा मास्क चा वापर करावा. महानगपालिकेच्या आठही रुग्णालयांत कोरोना रुग्णांकरिता तपासणी उपकरणे मोफत उपलब्ध आहेत.

तसेच ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय, आकुर्डी, येथे कोरोना रुग्णांकरिता उपचाराकामी लागणारे सर्व औषधोपचार व पुरेशा खाटा मोफत उपलब्ध आहेत. (Pimpri) गरज भासल्यास नवीन थेरगांव रुग्णालय, नविन भोसरी रुग्णालय, नविन जिजामाता रुग्णालय व कै. वायसीएमच रुग्णालय येथे कोरोनाचे रुग्ण दाखल करणेकामी खाटांची उपलब्धता त्वरित करणेत येईल, असे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.