Akurdi : प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पावसाळ्यात होणार पूरस्थितीचा धोका – इखलास सय्यद

 एमपीसी न्यूज – आकुर्डी दत्तवाडी भागात द्वारकामाई साई मंदिरा पासून ते आकुर्डी गावापर्यंत मोठा नाला वाहतो. या नाल्यामधून ड्रेनेज लाईन गेलेली आहे. (Akurdi) संपूर्ण दत्तवाडीची अंतर्गत ड्रेनेज लाईन या नाल्यातील ड्रेनेजला ठीक ठिकाणी जोडली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या भागात प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पूरस्थितीचा धोका निर्माण होईल, अशी भीती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इखलास सय्यद यांनी व्यक्त केली.

सय्यद म्हणाले, प्राधिकरणातील शाळा परिसरातील पावसाचे पाणी ,लोकमान्य हॉस्पिटल परिसरातील पावसाचे पाणी वाहून नेणारी मोठी स्टॉर्म  वॉटर लाईन गणेश मंदिर जवळील वाहणाऱ्या नाल्यात येऊन मिळते.  असे असूनही ‘अ ‘ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासनाच्या मार्फत काही दिवसांपूर्वी सदर स्ट्रॉम वॉटर लाईन ही नाल्यातील ड्रेनेज लाईनला जोडण्यात आली आहे . या चुकीच्या कामा मुळे पावसाळ्यात पुराची अतिशय  गंभीर परिस्थिति निर्माण होण्याची संभावना आहे.

Sangvi : नोकरीच्या बहाण्याने महिलेची 39 लाखांची फसवणूक

टेल्को कपूर सोसायटी , माताजी सुपर मार्केट मागील परिसर , साई दर्शननगर , मोरेवाडा , आदर्श मित्र मंडळ , जैन मंदिर , साई अपार्टमेंट, जे वाय . पाटील बिल्डिंग परिसरात (Akurdi) मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी तुंबुन पूर सदृश्य परिस्थिति निर्माण होण्याची शक्यता आहे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.