Pimpri : शहरात कोरोनाचे 181 सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri) हद्दीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून आजमितीला 181 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसून शासनाकडे लसीची मागणी करण्यात आलेली आहे.

रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण 5 आहेत. तर, गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 176 आहे. 1 जानेवारी 2023 पासून कोरोनामुळे एकाचा मृत्यु झाला.  मंगळवारी खासगी रुग्णालयात 89 वर्षीय वयोवृद्ध पुरुष रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. हा रुग्ण श्वसन आजारकरिता 31 मार्चपासून खासगी रुग्णालयात दाखल होता. खाजगी रुग्णालयाद्वारे रुग्णाच्या मृत्युबाबत माहिती बुधवारी रात्री उशिराने प्राप्त झालेली आहे.

Alandi : इंद्रायणी नदी पुन्हा केमिकलयुक्त पाण्याने फेसाळली

कोरोना आजारास घाबरून जाऊ नये. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप इ. लक्षणे असल्यास त्वरीत नजीकच्या महापालिकेच्या दवाखाना/रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोनाची तपासणी करून घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे किंवा मास्क चा वापर करावा. (Pimpri) महानगपालिकेच्या आठही रुग्णालयांत कोरोना रुग्णांकरिता तपासणी उपकरणे मोफत उपलब्ध आहेत. तसेच ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय, आकुर्डी, येथे कोरोना रुग्णांकरिता उपचाराकामी लागणारे सर्व औषधोपचार व पुरेशा खाटा मोफत उपलब्ध आहेत,

गरज भासल्यास नविन थेरगांव रुग्णालय, नविन भोसरी रुग्णालय, नविन जिजामाता रुग्णालय व वायसीएम रुग्णालय येथे कोरोना रुग्ण दाखल करणेकामी खाटांची उपलब्धता त्वरित करण्यात येईल.(Pimpri) सद्यस्थितीत महानगरपालिकेकडे कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसून याकामी शासनाकडे लसीची मागणी करण्यात आलेली आहे. लवकरच लस उपलब्ध होईल, असे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.