Alandi : इंद्रायणी नदी पुन्हा केमिकलयुक्त पाण्याने फेसाळली

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतून (Alandi) तसेच इंद्रायणी नदी काठच्या गावातील कारखान्यातून इंद्रायणी नदीत मैलमिश्रित केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडत असल्याने दि.6 एप्रिल रोजी केमिकलयुक्त पाण्याने इंद्रायणी पुन्हा फेसाळलेली दिसून आली.

Pune : डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कारांची घोषणा

मागील महिन्या भरात वारंवार इंद्रायणी नदी केमिकलयुक्त पाण्याने फेसाळलेली दिसून येत होती. सद्यस्थितीत सिध्दबेट बंधाऱ्यातून  नदीपात्रात पडणाऱ्या पाण्याचा केमिकल युक्त फेस तयार होऊन काही केमिकल युक्त फेस हवेमध्ये उडताना चे चित्र तिथे दिसून येत होते. (Alandi) तसेच तेथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात फेस निर्माण होताना दिसून येत होता. या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे जलचर सृष्टीसह मानवी जीवन ही धोक्यात आले आहे. वारंवार  होणाऱ्या या जलप्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे नियंत्रण मंडळ लक्ष कधी जाणार?याबाबत नागरिकांकडून विचारणा होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.