Pune : डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कारांची घोषणा

प्रमोद महाराज जगताप यांना कीर्तनकार तर रघुवीर खेडकर यांना लोककला पुरस्कार

एमपीसी न्यूज  : वै. डॉ. रामचंद्र देखणे यांचे साहित्यलोककलावारकरी संप्रदाय या क्षेत्रांमधील योगदान लक्षात घेऊन तसेच त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून संत विचार प्रबोधिनीतर्फे वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार 2023‘ प्रदान करण्यात येणार आहेत. (Pune) ‘वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार 2023कीर्तनकार‘ हा पुरस्कार सुप्रसिद्ध वारकरी कीर्तनकार ह. भ. प. प्रमोद महाराज जगताप यांना तर वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कर 2023लोककला‘ हा पुरस्कार प्रसिद्ध लोककलावंत रघुवीर खेडकर यांना जाहीर करण्यात आला आहेअशी माहिती डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली.

 

वै. डॉ. रामचंद्र देखणे हे साहित्यिक, संत व लोकवाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक तसेच कीर्तनकार, व्याख्याते, प्रवचनकार आणि बहुरूपी भारूडकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी संतसाहित्य, लोकसाहित्य, ललित, संशोधनात्मक व चिंतनात्मक अशी 52 पुस्तके लिहिली. (Pune) मराठीतील सर्वच प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये व नियतकालिकांमध्ये तीन हजाराहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. महाराष्ट्र तसेच अमेरिका, दुबई येथील विविध व्याख्यानमालांमधून त्यांनी 3500हून अधिक व्याख्याने दिली. एकूण 16 साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. संत एकनाथ महाराजांच्या पारंपरिक भारूडांवर आधारित ‘बहुरूपी भारूड’ या कार्यक्रमांचे 2100हून अधिक प्रयोग केले.

Nigdi : वृद्ध महिलेच्या दोन लाखांच्या बांगड्या पळवल्या

डॉ. देखणे हे निष्णात वारकरी होते. ‘संत विचार प्रबोधिनी’ दिंडी घेऊन अनेक वर्षे त्यांनी पंढरपूरची वारी केली. 26 सप्टेंबर 2022 रोजी त्यांच्या अचानक झालेल्य निधनाने सांस्कृतिक व साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. साहित्य क्षेत्रातील व वारकरी सांप्रदायातील त्यांच्या योगदानाप्रित्यर्थ त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हे पुरस्कार देण्यात येणार आहेत, असे डॉ. भावार्थ देखणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पुरस्कार वितरण समारंभ बुधवार, दि. 12 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता गरवारे कॉलेज सभागृह, कर्वे रोड येथे होणार आहे. पुरस्कार वितरण वै. धुंडामहाराज देगलूरकर यांचे नातू, प्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार ह. भ. प. चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या हस्ते होणार असून डॉ. डी. वाय. पाटील (Pune) विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आहेत. कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध गायक व अभिनेते अवधूत गांधी यांच्या सांप्रदायिक पंचपदीने होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.