Pimpri Chinchwad Covid : पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुन्हा वाढतोय कोरोना?

एमपीसी न्यूज : गेल्या अनेक महिन्यांपासून शांत (Pimpri Chinchwad Covid) असलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. पिंपरी-चिंचवड या औद्योगिक शहरामध्ये कोविड पॉझिटिव्ह प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. येथे गेल्या 15 दिवसात दिवसाला किमान 20 प्रकरणे आढळून आली आहेत. मंगळवारपर्यंत कोरोनाचे 203 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. 9 मार्चपर्यंत शहरात एकही सक्रिय रुग्ण सापडला नव्हता.

पीसीएमसी प्रशासनाने मात्र कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे सांगितले. परिणामी, त्यांच्यापैकी बरेच जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आतापर्यंत गंभीर लक्षणे असलेल्या केवळ तीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

DC-GT : मिलर आणि साई सुदर्शन यांच्या मदतीने गुजरातचा दिल्लीवर विजय

महाराष्ट्रातील पहिला कोविड रुग्ण 10 मार्च 2020 रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये नोंदवला गेला. त्यानंतर लगेचच, पुढील दोन वर्षांत शहरात तब्बल 4,630 कोविड मृत्यूची नोंद झाली.

कोविड प्रकरणांमध्ये अपेक्षित वाढ लक्षात घेता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) सांगितले, की त्यांनी वैद्यकीय आणि आरोग्य विभागाला ही परिस्थिती उद्भवताच सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जारी केले आहेत. तसेच,  गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी उच्च अधिकारी आणि डॉक्टरांची (Pimpri Chinchwad Covid)  बैठक घेतली आणि त्यांना कोविड रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ रोखण्यासाठी पायाभूत सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.